लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक (अॅडमिनिस्ट्रेशन) डॉ. जतिंदर अरोरा व डायरेक्टर (आॅपरेशन्स) सूरज त्रिपाठी यांनी दीप प्रज्वलन केले. डॉ. नितीन वडसकर, डॉ. नितीन डंभारे, डॉ. ऋषी लोहिया, डॉ. निशांत देशपांडे, डॉ. अभिषेक वांकर, डॉ. अभिजित देशमुख आणि डॉ. प्रकाश जैन यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले तर सागर मधुमटके, सारंग जोशी, विजय चिवंडे, श्रुती चौधरी व सोनाली यांनी आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांची मने जिंकली. संचालन नेहा जोशी यांनी केले. पहिल्या सत्रात डॉ. नितीन वडसकर म्हणाले, अनियमित दिनचर्या, बदलती जीवनशैली व तणावामुळे देशात डायबिटीजचे रुग्ण वाढत आहेत. अशक्तपणा, भूक लागणे, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांनी कमी दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अनुवांशिकता आणि जास्त वजनामुळेही हा आजार होऊ शकतो. डॉ. ऋषी लोहिया म्हणाले, शुगरच्या रुग्णांना हृदयरोगाची शक्यता असते. त्यांना ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते. छातीत दुखण्याचे कारणही शुगर असू शकते. त्यामुळे रक्तदाबाची तपासणी आणि वर्षातून किमान एकदा ईसीजी करणे आवश्यक आहे. दुसºया सत्रात डॉ. नितीन डंभारे यांनी सांगितले की, या आजारामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा बंद होऊन जाते. त्यामुळे वेळोवेळी इन्सुलिन देणे गरजेचे आहे. औषध बंद करून घरगुती उपचार करणे घातक ठरू शकते. डॉ. अभिषेक वांकर म्हणाले, शुगरमुळे रक्ताभिसरण बाधित होते. धमण्यांवरील दबावामुळे शरीरात आग, मुंग्या येण्याची शक्यता असते. तिसºया सत्रात डॉ. अभिजित देशमुख यांनी डायबिटीजमुळे पोटाचे विकार वाढत असल्याचे सांगितले. हे विकार अनियंत्रित झाल्यास फुफ्फुस आणि पैन्क्रियाजलाही नुकसानकारक ठरू शकतात. डॉ. निशांत देशपांडे म्हणाले, डायबिटीज किडनीच्या फिल्टरला खराब करू शकते. त्यामुळे प्रोटीन, मिठाची मात्रा संतुलित असली पाहिजे. डॉ. प्रकाश जैन म्हणाले, गँगरिन किंवा इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. सध्या असे तंत्र उपलब्ध आहे की ज्याद्वारे अवयव कापण्याची गरज पडत नाही.
नागपुरात डॉक्टर-गायकांसोबत रंगले ‘शुगर संगीत’ !!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:47 AM
लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम