सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : वर्षभरात ३६३ हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:52 AM2019-07-26T00:52:01+5:302019-07-26T00:55:05+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी गुंतागुंतीच्या व गंभीर स्वरुपातील हृदय शस्त्रक्रिया होत नसल्याचा तक्रारी होत्या. येथील रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही आरोप होते. परंतु गेल्या वर्षापासून या सर्व शस्त्रक्रिया आता ‘सुपर’मध्ये होऊ लागल्या आहेत. जुलै २०१८ ते जून २०१९ या दरम्यान ३६३ हृदय शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले व आर्थिक स्थिती बेताची असलेले होते.

Super Specialty Hospital: 363 heart surgeries a year | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : वर्षभरात ३६३ हृदय शस्त्रक्रिया

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : वर्षभरात ३६३ हृदय शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देसीव्हीटीएस विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी गुंतागुंतीच्या व गंभीर स्वरुपातील हृदय शस्त्रक्रिया होत नसल्याचा तक्रारी होत्या. येथील रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही आरोप होते. परंतु गेल्या वर्षापासून या सर्व शस्त्रक्रिया आता ‘सुपर’मध्ये होऊ लागल्या आहेत. जुलै २०१८ ते जून २०१९ या दरम्यान ३६३ हृदय शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले व आर्थिक स्थिती बेताची असलेले होते.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ‘सीव्हीटीएस’ विभागाची जबाबदारी प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांच्याकडे विभाग प्रमुख म्हणून जुलै २०१८ मध्ये सोपविण्यात आली. त्यांनी आल्या आल्या शस्त्रक्रियेचा सपाटा सुरू केला. विशेष म्हणजे, हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्ताभिसरण थांबवून महाधमनीवर अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अ‍ॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ सारख्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या. परिणामी, कमी दिवसातच सीव्हीटीएस’ विभागात रुग्णांची गर्दी दुपटीने वाढली. जून २०१९ पर्यंत ३६३ हृदय शस्त्रक्रिया डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या. यात डॉ. अंबरीश, डॉ. चंदन व डॉ. कुणाल यांनी सहकार्य केले.
मृत्यूचे प्रमाण २० टक्क्याहून ६.८ टक्क्यांवर
जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत हृदय शस्त्रक्रियेनंतर १०९ रुग्णांचे मृत्यू झाले होते. हे प्रमाण २० टक्के होते. परंतु जुलै २०१८ ते जून २०१९ या कालावधीत हे मृत्यूचे प्रमाण ६.८ वर आले आहे. परिणामी, शुल्क भरून हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली. गेल्या वर्षात ५५ रुग्णांनी शुल्क भरून हृदय शस्त्रक्रिया केल्या.
‘रेक्सप्लोरेशन’चे प्रमाण आले ०.८ टक्क्यांवर
हृदय शस्त्रक्रियेनंतर हृदयात रक्तस्राव होणे, ‘बीपी’ खूप जास्त राहणे किंवा इतरही समस्या येत असल्यास पुन्हा शस्त्रक्रियेची गरज पडणाऱ्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘रेक्सप्लोरेशन’ म्हटले जाते. जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत अशा ३५ शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. परंतु जुलै २०१८ ते जून २०१९ या वर्षात अशा केवळ तीनच शस्त्रक्रिया झाल्या. टक्केवारी नुसार हे प्रमाण ०.८ टक्के एवढे आहे.


सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागात येणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यातही ९९ टक्के रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले असतात. कारण अशा रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते. शिवाय, या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताचीच राहत असल्याने हे रुग्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येतात. गेल्या वर्षात अशा ३६३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
डॉ. निकुंज पवार
प्रमुख, सीव्हीटीएस विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

Web Title: Super Specialty Hospital: 363 heart surgeries a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.