सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:56 AM2018-04-06T00:56:40+5:302018-04-06T00:56:52+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाचे ‘अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स’ सुरू झाले आहे. हे तिन्ही औषधालय ‘ओपीडी’च्या परिसरात असल्याने जागेचा तर प्रश्न निर्माण झाला आहेच, रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

Super Specialty Hospital: Three Dispensaries at OPD Place | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाचे ‘अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स’ सुरू झाले आहे. हे तिन्ही औषधालय ‘ओपीडी’च्या परिसरात असल्याने जागेचा तर प्रश्न निर्माण झाला आहेच, रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये अत्यल्प दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्टÑ स्टेट को-आॅप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई या सहकारी संस्थेच्या औषध दुकानांना मंजुरी दिली. या दुकानांसाठी अत्यल्प दरात जागा देण्यात आली. परंतु ‘जागृत मेडिकल स्टोर्स’च्या नावाने सुरू झालेल्या या औषधालयात औषधांवरील सूटला घेऊन रुग्णांच्या नेहमीच तक्रारी राहिल्या आहेत. नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण परिसरात हे औषधालय साधारण गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, या औषधालयांमधून जेनेरिक औषधांसह अनेक महत्त्वाची औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. यामुळे आजही या औषध दुकानाला रुग्णांकडून फारसा प्रतिसाद नाही. यातच केंद्र शासनाचा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अमृत दीनदयाल’ औषधालय सोमवारपासून ‘सुपर’मध्ये सुरू झाले. या औषध दुकानातून ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनी’द्वारे कर्करोगाच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणारी १८६ औषधांसह १४८ इतर औषधे बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तूर्तासतरी अनेक औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य या दुकानात उपलब्ध नाही. महत्त्वाचे म्हणजे, ‘सुपर’च्या स्वत:च्या औषधालयातच महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा पडला आहे. यामुळे रुग्ण मोठ्या आशेने या दोन्ही औषध दुकानांमध्ये जात असलेतरी त्यांचा हिरमोड होत आहे.

Web Title: Super Specialty Hospital: Three Dispensaries at OPD Place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.