सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव हायकोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:57 PM2019-07-03T21:57:57+5:302019-07-03T21:59:10+5:30
गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने हेडरी पोलिसांना वाहन जाळपोळीचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे कथित नक्षलसमर्थक अॅड. सुरेंद्र गडलिंग व प्रा. वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून यावर ८ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने हेडरी पोलिसांना वाहन जाळपोळीचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे कथित नक्षलसमर्थक अॅड. सुरेंद्र गडलिंग व प्रा. वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून यावर ८ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.
प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१६ मध्ये नक्षलवादींनी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड डोंगरावर ८० वाहने जाळली. त्यानंतर हातात आलेल्या पुराव्यांवरून गडलिंग व राव यांचाही या घटनेशी संबंध असल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध हेडरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. सध्या हे दोघे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. निहालसिंग राठोड तर, सरकारतर्फे अॅड. रितू शर्मा यांनी कामकाज पाहिले.