तरुणांनी क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हावे : सुशीलकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:40 AM2018-11-28T01:40:42+5:302018-11-28T01:41:47+5:30
क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देशाचे नाव उंचावण्याची तरुणांना संधी असून आवडत्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देशाचे नाव उंचावण्याची तरुणांना संधी असून आवडत्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांनी केले.
महामेट्रो नागपूर मॅराथॉननिमित्त नागपुरात आलेल्या प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘२६/११’ या दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवणारे प्रवीण कुमार यांनी मेट्रो हाऊस येथे सदिच्छा भेट दिली. महामेट्रोचे संचालक (वित्त) एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी शहरात निमार्णाधीन महामेट्रो नागपूर प्रकल्पाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत कशाप्रकारे प्रगती केली, याची माहिती त्यांना दिली. दोघांनीही मेट्रो प्रकल्पात आतापर्यंत झालेल्या कार्याची प्रशंसा केली.
सुशील कुमार आणि प्रवीण कुमार म्हणाले, खेळाप्रती आपला देश प्रगती करीत असून हरियाणासह महाराष्ट्रदेखील चांगली कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सुशील कुमार आणि प्रवीण कुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेतली. महामेट्रोच्यावतीने आयोजित ‘महामेट्रो नागपूर मॅराथॉन २०१८’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोच्या संख्येने लहान मुले, तरुण आणि महिला मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मॅराथॉन स्पर्धेत भाग घेतला.