लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र्र्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे.दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये कांचनमाला भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू होती. या स्पर्धेमध्ये एस-११ या श्रेणीत २०० मीटर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली. तिच्या सत्काराप्रसंगी १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.आॅलिम्पिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याची योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील तरतुदींनुसार पॅराआॅलिम्पिक तसेच पॅराएशियन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाºया खेळाडूंना अनुक्रमे ३० लाख रुपये व ३ लाख रुपये इतके रोख बक्षीस देण्याची तरतूद आहे. मात्र, वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा योजनेमध्ये समावेश नव्हता. तथापि, कांचनमालाचे कौतुकास्पद यश लक्षात घेता, एक विशेष बाब म्हणून या योजनेतून रोख पारितोषिक देऊन गौरव करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मुख्यमंत्र्यांनी आज मंजुरी दिली आहे.
जलतरणपटू कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाखांचे पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:22 AM
मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावास मंजुरी