नागपुरात टँकरचा पाणीपुरवठा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:07 AM2018-04-17T01:07:46+5:302018-04-17T01:08:00+5:30

डिसेंबर २०१८ पर्यंत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, अशी घोषणा सत्तापक्षाने केली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता शहर टँकरमुक्त होण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या ३४० पर्यंत वाढली आहे. हुडकेश्वर व नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आल्याने टँकर वाढले आहेत. सोमवारी स्थायी समितीने टँकरच्या प्रत्येक फेरीच्या दरात ९ रुपयांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Tanker water supply in Nagpur is expensive | नागपुरात टँकरचा पाणीपुरवठा महागला

नागपुरात टँकरचा पाणीपुरवठा महागला

Next
ठळक मुद्देस्थायी समितीने फेरीमागे वाढविले ९ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिसेंबर २०१८ पर्यंत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, अशी घोषणा सत्तापक्षाने केली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता शहर टँकरमुक्त होण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या ३४० पर्यंत वाढली आहे. हुडकेश्वर व नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आल्याने टँकर वाढले आहेत. सोमवारी स्थायी समितीने टँकरच्या प्रत्येक फेरीच्या दरात ९ रुपयांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नियमानुसार ही वाढ करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
अमृत योजना कार्यान्वित झाल्यानतंर शहरातील टँकर कमी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. दोन हजार लिटर क्षमतेच्या टँकरला प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला प्रतिफेरी ३८६ रुपये तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला ४२४ रुपये दर दिला जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत अवजड वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. यात ५.६५ कोटींचे बॅक हो लोडल, टिप्पर, पोकलॅन, स्क्रीड स्टियर लोडर व डोजर अशा विविध प्रकारची वाहने खरेदी केली जाणार आहेत. यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मे. जगताप अ‍ॅन्ड असोसिएट यांना ४.५१ लाखांची रक्कम दिली जाणार आहे.
महापालिके चे अधिकारी डीपीआर तयार करीत नसल्याने सल्लागाराची नियुक्ती करावी लागते, अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.

Web Title: Tanker water supply in Nagpur is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.