तांत्रिक पेचात अडकला नागपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:36 PM2018-11-05T22:36:52+5:302018-11-05T22:38:13+5:30

ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने नागपूर जि.प.ला चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. कोट्यवधी रुपये इमारतीच्या बांधकामाला दिले. जिल्हा आरोग्य केंद्रासारख्या भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षभरापासून बनून तयार आहे. परंतु तांत्रिक पेचात या इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त अडकला आहे.

The technical feather trapped in Nagpur district is the foremost of four PHCs | तांत्रिक पेचात अडकला नागपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचा मुहूर्त

तांत्रिक पेचात अडकला नागपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचा मुहूर्त

Next
ठळक मुद्देकोट्यवधीच्या इमारती बनून तयार : भौतिक सुविधेचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने नागपूर जि.प.ला चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. कोट्यवधी रुपये इमारतीच्या बांधकामाला दिले. जिल्हा आरोग्य केंद्रासारख्या भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षभरापासून बनून तयार आहे. परंतु तांत्रिक पेचात या इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त अडकला आहे.
नागपूर जि.प.चे ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासनाने आणखी ७ प्राथमिक आरोग्य केंद्र २०१३ मध्ये मंजूर केले होते. यातील चार प्र्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. यात नागपूर तालुक्यातील सालई गोधनी, कामठी तालुक्यातील भूगाव मेंढा, मौद्यातील धानला आणि नरखेड येथील भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका आरोग्य केंद्राला किमान ७ ते ८ कोटी रुपये खर्च आला आहे. अतिशय दर्जेदार बनलेल्या या इमारती केवळ गावाची शोभा वाढवित आहे.
शासनाने आरोग्य केंद्र मंजूर केले, त्यासाठी पदमंजुरीही दिली. परंतु त्यांचे वेतन कुठल्या लेखाशिर्षांतर्गत करायचे यासंदर्भात मार्गदर्शन केले नाही. त्याचबरोबर आरोग्य केंद्रामध्ये फर्निचरसोबतच इतर भौतिक सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. जि.प.च्या आरोग्य विभागाने यासंदर्भात आरोग्य विभागाच्या सहा. संचालकाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यांच्याकडून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.

उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी जि.प. अध्यक्ष मुख्यमंत्र्यांसाठी आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्याशिवाय उद्घाटन करायचे नाही, असे त्यांचे मौखिक आदेश आहे. अध्यक्षांच्या या आग्रही भूमिकेमुळे उद्घाटनाला मुहूर्त सापडत नाही. यासंदर्भात अध्यक्ष निशा सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

हस्तांतरणासही होतोय विलंब
इमारतीचे बांधकाम हे जि.प.च्या बांधकाम विभागाने केले आहे. फर्निचरच्या निविदा अद्यापही प्रलंबित आहे. बांधकाम विभाग आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यास आग्रही आहे. परंतु भौतिक सुविधा व शासनाकडून पदमान्यते संदर्भात सूचना नसल्याने आरोग्य विभाग हस्तांतरणास चालढकल करीत आहे.

तर उद्या उद्घाटन करू
आरोग्य केंद्राच्या इमारती मंजूर झाल्यानंतर, त्याच्या पदमान्यतेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. वारंवार पत्रव्यवहार मंत्रालयस्तरावर करण्यात आला आहे. शासनाने प्रस्तावावर मार्गदर्शन केल्यास उद्या उद्घाटन करू.
शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.

Web Title: The technical feather trapped in Nagpur district is the foremost of four PHCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.