लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सासुरवाडी कार्यक्रमासाठी गेलेल्या एका व्यक्तीकडे दुपारच्या सुमारास चोरटे घरात शिरले. मात्र शेजाऱ्यांनी समयसूचकता दाखवत दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निलेश तांदुळकर (४०, मेहेरबाबा नगर, पिपळा रोड) यांच्या सासुरवाडीला वास्तुपुजनाचा कार्यक्रम होता. ४ मे रोजी ते सकाळी त्यासाठी सोनेगावला गेले. रविवारी दुपारी १ वाजताच्या दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर शेजारच्या महिलेचा फोन आला व घरात चोर शिरल्याची माहिती मिळाली. हे ऐकून निलेश तातडीने घराच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या घराच्या बेडरूममधून सोन्याचे दागिने व मोबाईल असा १.४३ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची बाब समोर आली. वस्तीतील लोकांनी तीन चोरट्यांपैकी दोघांना पकडले व पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी तातडीने येऊन विशाल राम गायकवाड (२४, कैकाडीनगर) व विक्की उर्फ सायमन जॉर्ज रामटेके (२४, रामटेके नगर टोली) यांना अटक केली. आरोपींनी त्यांचा तिसरा साथीदार शुभम (रामटेकेनगर टोली) हा दागिने घेऊन पसार झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.