पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:11 PM2020-09-25T13:11:28+5:302020-09-25T13:11:48+5:30

आईच्या गर्भातील बाळाला थेट कोविड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक ती सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला.

There is no danger to the fetus from a positive mother | पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

Next
ठळक मुद्देकोविड संवादमध्ये शंकांचे निरसन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड हा संसर्गजन्य आजार आहे. तो संसर्गातून पसरतो मात्र आईच्या गर्भातील बाळाला थेट कोविड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक ती सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला.
महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने कोविड संवादमध्ये गुरुवारी 'गर्भावस्था आणि कोविड' तसेच 'कोविड काळात घ्यावयाची काळजी' या विषयावर शिवांगी जहागीरदार आणि कन्सल्टन्ट प्लास्टिक सर्जन व आयएमए चे सहसचिव डॉ. समीर जहागीरदार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

शिवांगी जहागीरदार म्हणाल्या, गर्भवती महिलांनी गर्दीत, बाहेर निघू नये. घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास गर्भवती महिलेलाच बाधित व्यक्तीपासून किंवा इतरांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी. गर्भावस्थेत होणाऱ्या सर्व तपासण्या अवश्य करण्यात याव्यात. प्रसूतीनंतर आईकडून बाळाला स्तनपान करणे अत्यावश्यक आहे. आईला कोरोनाची जास्त लक्षणे असल्यास बाळाला आईचे दूध चमच्याने पाजावे, ते शक्य नसल्यास डोनर मिल्क बँकमधीलही दूध देता येईल, असेही जहागीरदार म्हणाल्या.

एन- ९५ मास्कचा पुनर्वापर टाळा- समीर जहागीरदार

मास्कचा योग्य वापर कसा करावा, तो का आवश्यक आहे, तो न लावल्यास काय दुष्परिणाम होतात, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. एन ९५ मास्कचा पुनर्वापर करणे टाळावे. पुनर्वापरासाठी त्रिस्तरीय कापडी मास्कचा वापर करावा. मात्र वापर झाल्यानंतर त्याला किमान अर्धा तास सोडिअम हायपोक्लोराईडच्या १ टक्के मिश्रणात भिजवून ठेवावे. त्यानंतर ७२ तास ते उन्हान वाळत ठेवावे व त्यानंतरच त्याचा वापर करावा. 

व्हिटॅमिन सी आणि डी सर्वांनीच घ्यावे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी आणि डी यामध्ये पोषक तत्वे आहेत. या दोन्ही व्हिटॅमिनचे सेवन केल्यानंतर आपले शरीर त्याचे अतिरिक्त जतन करून ठेवत नाही. व्हिटॅमिन सी आणि डी सर्वांनीच घ्यावे. झिंकचे औषध प्रमाणात घेणे आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे समीर जहागीरदार म्हणाले.

कोविड रुग्णांवर शस्त्रक्रिया धोकादायक
कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येऊ शकणाºया शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जातात. शस्त्रक्रिया करताना आॅपरेशन थेटरमध्ये रुग्णाचा डॉक्टर आणि इतर सहायकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांसह आॅपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपले सर्व शरीर सुरक्षित ठेवण्याचे कटाक्षाने पाळणे आवश्यक असल्याचे डॉ.वाय.एस.देशपांडे यांनी केले.




 

 

Web Title: There is no danger to the fetus from a positive mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.