लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. संयुक्त बैठकीत लॉकडाऊन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यातून शनिवार आणि रविवारी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी शिस्तीचे पालन करीत 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद दिला. यापुढेही अशीच शिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज नाही. प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला सलाम, असल्याची प्रतिक्रिया महापौरसंदीप जोशी यांनी दिली.'जनता कर्फ्यू'चा आढावा घेण्यासाठी शनिवारी संदीप जोशी यांनी शहराचा दौरा केला. विनाकारण फिरणाऱ्यांना समज दिली, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दी दिसली तिथे फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले. या पाहणी दौºयात बडकस चौक,शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, सदर, जरीपटका, इंदोरा, इतवारी, पाचपावली, गांधीबाग, महाल, यशवंत स्टेडियम शहरातील या आणि अशा सर्वच बाजाराच्या ठिकाणी महापौरांनी भेट देऊन पाहणी केली.मानसिकता बदलवण्याची संधीदोन्ही दिवस नागपूरकरांनी असाच प्रतिसाद कायम ठेवावा. काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांच्या घरातील ज्येष्ठ आणि लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या 'जनता कर्फ्यू'नंतरही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. शासनाच्या नियमाचे सर्वांनी पालन केल्यास शहरात लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. असे संदीप जोशी म्हणाले.
कर्फ्यूप्रमाणे पुढेही शिस्त पाळली तर लॉकडाऊन नाही! महापौर संदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 8:26 PM
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी शिस्तीचे पालन करीत 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद दिला. यापुढेही अशीच शिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज नाही. प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला सलाम, असल्याची प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी दिली.
ठळक मुद्देप्रतिसाद देणाऱ्या नागपूरकरांना सलाम!