कापूस वेचणीला मजूर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:25+5:302020-12-11T04:27:25+5:30
कामठी : परतीच्या पावसामुळे आधीच शेतातील कापसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच कापूस वेचणीचे दरही वाढले. कपाशीचा दुसरा वेचा वेचण्यासाठी ...
कामठी : परतीच्या पावसामुळे आधीच शेतातील कापसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच कापूस वेचणीचे दरही वाढले. कपाशीचा दुसरा वेचा वेचण्यासाठी प्रति किलाे ८ ते १० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने कामठी तालुक्यातील कापूस उत्पादक हवालदिल झाले आहेत.
यावर्षी तालुक्यातील ५,५७८ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे कपाशी लागवड क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली हाेती. मात्र, मध्यंतरी काेसळलेल्या पावसामुळे कापसाचा महत्त्वाचा पहिला वेचा भिजल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय, सततचा पाऊस व किडींचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनचे पीकही शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त कपाशीच्या पिकावर आहे.
हल्ली कपाशीचा दुसरा वेचा वेचणीला आला आहे. तालुक्यात किलाेप्रमाणे कापसाची वेचणी केली जात असून, यावर्षी हे दर प्रति किलाे ८ ते१० रुपये झाले आहेत. या दराप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करणे शक्य हाेत नाही. ही समस्या साेडवायची कशी, हे सुचेनासे झाले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
---
प्रत खालावली
सततचा तसेच परतीचा पाऊस तसेच प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी कपाशीवर बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेऊन बाेंडं काळी पडायला व सडायला सुरुवात झाली हाेती. त्यातच गुलाबी बाेंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येताे. दमट वातावरण व पावसामुळे बाेंडातील कापूस काळसर पडत असून, कापसाचा दर्जा खालावला आहे. त्यात गुलाबी बाेंडअळीने भर टाकली आहे. राेग व किडींपासून पिकाला वाचविण्यासाठी अतिरिक्त फवारणी करावी लागल्याने कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. प्रत खालावल्याने भाव मात्र कमी मिळत असल्यााने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.