शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

चोरट्यांनी ट्रक पळविला

By admin | Published: January 02, 2017 2:37 AM

चार अनोळखी चोरट्यांनी पाठलाग करून ट्रक अडविला आणि ट्रकचालकास रोडच्या कडेला असलेल्या झाडाला बांधून

चालकास झाडाला बांधले : बोरगाव शिवारातील घटना मौदा : चार अनोळखी चोरट्यांनी पाठलाग करून ट्रक अडविला आणि ट्रकचालकास रोडच्या कडेला असलेल्या झाडाला बांधून ट्रकमधील साहित्य लंपास केले. चोरून नेलेल्या साहित्याची एकूण किंमत २ लाख ६१ हजार ४०० रुपये आहे. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - भंडारा महामार्गावरील बोरगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री २.१५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी ट्रकचालक भुवनेश्वर जयपाल परसगाये (४०, रा. पंचशील चौक, देवरी, जिल्हा गोंदिया) हा मंगळवारी रात्री सीजी-०४/जेए-९३८४ क्रमांकाचा ट्रक घेऊन देवरीहून नागपूरकडे येत होता. या ट्रकमध्ये १०० नग सळाकी होत्या. दरम्यान, बोरगाव शिवारात त्याच्या ट्रकमधील डिझेल संपल्याने त्याने ट्रक रोडच्या कडेला उभा केला आणि ट्रकच्या केबिनमध्ये झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास चार अनोळखी तरुण या ट्रकजवळ आले आणि त्यांनी केबिनचे दार ठोठावले. त्यामुळे भुवनेश्वर यांनी दार उघडताच या चौघांपैकी एकाने त्यांना चाकूचा धाक दाखविला तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तसेच या चौघांनी त्याला रोडच्या कडेला असलेल्या झाडाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर या चौघांनीही ट्रकमधील साहित्य चोरून नेले. यात चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच टन सळाकी, सात हजार रुपये किमतीची बॅटरी, २,६०० रुपये किमतीचा प्रेशर जॅक आणि १,८०० रुपये किमतीची निळी ताडपत्री असा एकूण २ लाख ६१ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि ३४२, ३६५, ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)