दोन दिवसांत कोरोनाचे तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:29+5:302021-08-17T04:13:29+5:30
नागपूर : कोरोनाची भीती जवळजवळ नाहीशी झाल्याचे नागपूर जिल्ह्यातील चित्र आहे. मागील दोन दिवसांत म्हणजे, रविवारी १ तर सोमवारी ...
नागपूर : कोरोनाची भीती जवळजवळ नाहीशी झाल्याचे नागपूर जिल्ह्यातील चित्र आहे. मागील दोन दिवसांत म्हणजे, रविवारी १ तर सोमवारी २ असे ३ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे, ग्रामीणमध्ये व शहरात शुन्य रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९७१ तर मृतांची संख्या १०,११८वर स्थिरावली आहे.
नागपूर जिल्ह्यात रविवार १५ ऑगस्ट रोजी ५,३२२ चाचण्या झाल्या. यात शहरातील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. सोमवार १६ ऑगस्ट रोजी केवळ १,३९४ चाचण्या झाल्या. यात ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. मागील चार दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद नाही. मागील दोन दिवसात २३ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८२,७५० झाली असून, याचे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या कोरोनाचे १०३ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६३ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मेडिकलमध्ये १६, मेयोमध्ये ५, एम्समध्ये ३, कामठी येथील रुग्णालयात १५ रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १३९४
शहर : ० रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,९७१
ए. सक्रिय रुग्ण : १०३
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,७५०
ए. मृत्यू : १०,११८