शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

दीड हजार किमीचा प्रवास करून 'तो' वाघ आता परतीच्या वाटेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:54 PM

टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे.

ठळक मुद्देवाघ टिपेश्वरचा : ज्ञानगंगा अभयारण्य ते अजिंठा टेकड्यांचा दोन महिन्यात प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे. सध्या हा वाघ अजिंठाच्या जंगलातून परतीच्या मार्गाला लागला आहे.

हा वाघ सुमारे अडीच वर्षांचा असून टिपेश्वर अभयारण्यामध्ये त्याचा वावर होता. या अभरायरण्यामध्ये २७ फेब्रुवारी २०१९ ला त्याला कॉलर (टीपीडब्युएल टी-१/सी-१) बसविण्यात आली. आईपासून विभक्त झालेला हा वाघ आपल्या अधिवासाच्या शोधात आहे. टिपेश्वरमधून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये तो पोहचला होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याने ज्ञानगंगा अभयारण्यात भ्रमंती केली होती. त्यानंतर तो पश्चिमेकडे औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील अजिंठ्याच्या टेकड्या व अजिंठ्याच्या जंगलात पोहचला होता. डिसेंबरच्या मध्यात तो औरंगाबाद वन विभागाच्या फरदापूरमध्ये व त्यानंतर सोयगाव वन परिक्षेत्रात होता, अशी नोंद वन विभागाकडे आहे.सुरक्षित अधिवासाच्या शोधात असलेला हा वाघ आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. सध्या त्याचे वास्तव्य अजिंठ्यामध्ये नसल्याची नोंद त्याच्या कॉलर आयडी वरून वनविभागाने केली आहे. यावरून तो परतीच्या प्रवासाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी कालावधीत अधिक अंतर पार करणाऱ्या या वाघाने अद्याप कोणतीही अनुचित घटना स्वत:हून केली नसल्याचा निर्वाळा वन विभागाने दिला आहे.आतापर्यंत दीड हजार किलोमीटरचे अंतर पार करून हा वाघ निघाला आहे. कमी कालावधीत अधिक अंतर पार करण्याची त्याची क्षमता असल्याने एवढ्या कमी कालावधीत त्याने हे अंतर पार केले. त्याच्या सर्व हालचालीबाबत मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आणि अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) बी.एस. हुड्डा यांच्या मार्गदर्शानाखाली भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील तांत्रिक चमूच्या साहाय्याने त्याची इत्थंभूत माहिती वन विभागाला मिळत आहे.भ्रमणमार्गात अडथळा नकोया वाघाच्या परतीच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वनविभागाने आवाहन केले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी त्याच्या सुरक्षित अधिवासासाठी आणि भ्रमणमार्गासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य