बालकांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ जवानांना टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:32 AM2020-11-13T11:32:53+5:302020-11-13T11:34:40+5:30

child trafficking Nagpur News रेल्वे सुरक्षा दलाने जवानांना बालकांची तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले आहे. बिलासपूर मुख्यालयाने दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ४५ जवानांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे.

Tips for RPF personnel to prevent child trafficking | बालकांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ जवानांना टिप्स

बालकांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ जवानांना टिप्स

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यालयाने केले मार्गदर्शन लहान मुले राहणार सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा बालकांची तस्करी करण्यात येते. अनेक मुलांना पळवून किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर गावी नेण्यात येते. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले आहे. लहान मुलांची तस्करी होत असताना तस्करी कशी राखावी याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.

रेल्वे मार्गाने बालकांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे चाईल्डलाईन कार्यरत आहे. परंतु अनेकदा रेल्वे चाईल्डलाईनच्या सदस्यांना बालकांची तस्करी होत असल्याची बाब माहीत पडत नाही. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने जवानांना बालकांची तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले आहे. बिलासपूर मुख्यालयाने दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ४५ जवानांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणामुळे नागपूर विभागात बालकांची तस्करी रोखण्यास मदत होणार आहे.

या दिल्या टिप्स

-मुलगा अधिक रडत असल्यास त्यावर लक्ष द्यावे

-इतर प्रवाशांकडे विचारणा करावी

-शंका आल्यास मुलांसोबत बोलावे

-महिलांची तस्करी होत असल्यास त्यांची चौकशी करणे

 

मानवी तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ सज्ज

मानवी मानवी तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार आरपीएफ जवान सज्ज झाले आहेत. यानंतर मुलांची आणि महिलांची तस्करी होत असल्यास आरपीएफ जवान विशेष लक्ष देतील.

ए. के. स्वामी, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल दपुम रेल्वे, नागपूर विभाग

...

..

Web Title: Tips for RPF personnel to prevent child trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.