लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा झेंड्यांची विक्री वाढली असून केवळ गांधीसागर येथील खादी ग्रामोद्योग भवनातून जवळपास एक लाख रुपयांच्या तिरंगा झेंड्याची विक्री झाली आहे. नागपुरात लहानमोठ्या दुकानातून आणि अन्य राज्यांच्या खादी भंडारमधून होणाऱ्या कागदी आणि छोट्या कापडी तिरंगा झेंड्याची विक्रीची आकडेवारी २० लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे.कागदी आणि कापडी तिरंगा झेंड्यासोबत स्टीकर्स, बॅनर्स, स्टीलचे तिरंगी बिल्ले आदींसह अन्य संबंधित साहित्यांची सर्वाधिक विक्री होते. स्वातंत्र्यादिनानिमित्त सर्वाधिक झेंड्याच्या विक्रीसोबत खादीच्या पांढºया तयार कपड्यांची विक्री वाढली आहे. नागपूर खादी मंडळाच्या खादी ग्रामोद्योग भवनचे व्यवस्थापक तुलाराम नेहारे यांनी सांगितले की, खादीचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने मंडळाची स्थापना ६० वर्षांपूर्वी करण्यात आली. विक्रीसाठी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे आणि गृहउद्योगांकडून कपडे आणि रेडिमेड उत्पादने मागवितो व विक्री करतो. १५ आॅगस्टनिमित्त अन्य राज्यांच्या खादी भंडारचा तिरंगा झेंड्यांच्या विक्रीवर भर असतो. या दिवशी एरवीपेक्षा दहापट जास्त विक्री होत असल्याचे नेहारे यांनी स्पष्ट केले.