लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार वर्गातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नागपूर विभागातील १२ उपजिल्हाधिकाऱ्यांसह ५३ तहसीलदारांचा समावेश आहे.उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांची गोंदिया येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली. उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांची वर्धा जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी बदली करण्यात आली. शितल देशमुख यांना बनकर यांच्याजागी नियुक्ती देण्यात आली आहे. भंडारा येथील उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी विलास ठाकरे यांनी भंडारा येथे उपजिल्हाधिकारी (महसूल), मनिषा दांडगे यांची साकोली येथे उपविभागीय अधिकारी, अर्चना मोरे यांची वर्धा, दीप्ती सूर्यवंशी यांची वर्धा (उपजिल्हाधिकारी सामान्य) , आर.एम. जैन यांची वर्धा (उर्ध्व वर्धा प्रकल्प, भूसंपादन), संजय पवार यांची सावनेर उपविभागीय अधिकारी, घनश्याम भूगावंकर यांची चंद्रपूर निवासी उपजिल्हाधिकारी, तर प्रमोद भुसारी यांची भंडारा येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.नागपूर शहराचे तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांची विभागीय आयुक्त कार्यालय येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सूर्यकांत पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. अ.कृ.आ. विभागाचे तहसीलदार ए.खडतकर यांची गोंदिया येथे तर त्यांच्या जागी एस.के. वासनिक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगण्याचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांची बदली विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आली. निवडणूक विभागाच्या तहसीलदार उज्ज्वला तेलमासरे यांची मूल (चंद्रपूर) येथे तर त्यांच्या जागी आर.एम. भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली. नझूल तहसीलदार नीलिमा रंगारी यांची रामटेक (नागपूर) येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी के.डी.मेश्राम यांनी नियुक्ती करण्यात आली.
नागपुरातील १२ उपजिल्हाधिकाऱ्यांसह ५३ तहसीलदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:09 AM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार वर्गातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नागपूर विभागातील १२ उपजिल्हाधिकाऱ्यांसह ५३ तहसीलदारांचा समावेश आहे.
ठळक मुद्देकुंभारे,बनकरसह नागपूर जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश