शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

नागपुरात प्रवाशांच्या जीवावर ट्रॅव्हल्स चालकांची दिवाळी : प्रवास भाडे झाले तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:21 PM

खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिवाळीच्या काळात आपले प्रवासभाडे दुप्पट ते तिप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत असून त्यांची मोठी लूट होत आहे.

ठळक मुद्देदिवाळीत प्रवास महागला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेगाड्या फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीच्या साधनांकडे वळले आहेत. परंतु खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिवाळीच्या काळात आपले प्रवासभाडे दुप्पट ते तिप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत असून त्यांची मोठी लूट होत आहे.दिवाळीचा सण अनेकजण कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे प्लॉनींग करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात अनेकजणांना प्रवास करण्याची पाळी येते. प्रवासाचे स्वस्त माध्यम म्हणून प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहतूकदारांकडे वळत आहेत. परंतु दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी आपले दर तिप्पट केले आहेत. एसटी बसेसच्या प्रवास भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक रक्कम प्रवाशांकडून आकारण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव तिप्पट पैसे मोजून प्रवास करण्याची पाळी येत आहे. अनेक शहरात एकाच बाजूने प्रवासी मिळत असून परतीच्या प्रवासात बसेसमध्ये प्रवासी राहत नसल्यामुळे भाडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले. दिवाळीच्या काळात आठ दिवस ट्रॅव्हल्सचे प्रवास भाडे वाढलेले राहणार असून दिवाळी आटोपल्यानंतर नियमितपणे भाडे वसूल करण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्स संचालकांनी दिली.एरवीचे भाडे                 दिवाळीतील भाडेनांदेड ६००                    १०००नाशिक १२००              २५००पुणे १०००                  २५०० ते २८००हैदराबाद ९००           १४०० ते १८५०औरंगाबाद ७००         १२०० ते १५००सोलापूर ९००             १००० ते १२००सुरत ११००                 १४०० ते १८००एकाच बाजूने मिळतात प्रवासी‘नागपूर ते पुणे प्रवासात प्रवासी मिळत नसल्यामुळे प्रवास भाडे केवळ १ हजार रुपये आहे. परंतु पुणे-नागपूरसाठी २५०० ते २८०० रुपये आकारण्यात येत आहेत. वर्षभर आम्ही प्रवाशांना स्वस्त दरात प्रवासाची सुविधा देतो. परंतु दिवाळीच्या काळातील भाडे वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागतो. दिवाळी आटोपल्यानंतर नियमित भाडे वसूल करण्यात येईल.’महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन नागपूर

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकDiwaliदिवाळी