नागपुरातील शेखू गँगशी संबंधित मद्य व्यापाऱ्यांवर मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 09:20 PM2019-11-13T21:20:45+5:302019-11-13T21:23:37+5:30

पश्चिम नागपुरातील शेखू गँगला दारू तस्करीत मदत करून मालामाल बनणाऱ्या मद्य व्यापाऱ्यांवर पोलिसांची मेहेरनजर दिसून येत आहे. त्यामुळे यांना पोलिसांचे संरक्षण प्राप्त असल्याची चर्चा आहे.

Trust on liquor traders belonging to Shekhu gang in Nagpur | नागपुरातील शेखू गँगशी संबंधित मद्य व्यापाऱ्यांवर मेहरनजर

नागपुरातील शेखू गँगशी संबंधित मद्य व्यापाऱ्यांवर मेहरनजर

Next
ठळक मुद्देमहिनाभरानंतरही कारवाई नाही : तर्कवितर्कांना जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम नागपुरातील शेखू गँगला दारू तस्करीत मदत करून मालामाल बनणाऱ्या मद्य व्यापाऱ्यांवर पोलिसांची मेहेरनजर दिसून येत आहे. त्यामुळे यांना पोलिसांचे संरक्षण प्राप्त असल्याची चर्चा आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी काही दिवसापूर्वी शेखू गँगविरुद्ध मकोकाची कारवाई केली होती. शेखूसोबत शिवा बेजंकीवार, सूरज चौधरी, अथर्व खडाखडी, परवेश गुप्ता ऊर्फ चिडी मेश्राम आणि आकाश चव्हाणला आरोपी बनवले होते. शेखू अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. काही दिवसांपासून तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याला १० ऑक्टोबर रोजी चार साथीदारासह अटक करण्यात आली होती. त्याच्याजवळून पिस्तुल सुद्धा जप्त करण्यात आले होते. यापूर्वीही त्याची गर्लफ्रेण्ड् आणि दोन साथीदारास पकडण्यात आले होते. शेखू अनेक वर्षांपासून नागपुरातून वर्धा आणि चंद्रपुरात मद्य तस्करी करतो. तो दररोज लाखो रुपयाची दारू पोहोचवत होता. तो स्वत: ऐशोआरामाने राहायचा आणि साथीदारांनाही तसाच ठेवत होता.
पोलिसांनी जेव्हा शेखूशी संबंधित दारु व्यापारांची माहिती काढली तेव्हा त्यांना मेयो हॉस्पिटल चौक, बुटीबोरीसह अनेक ठिकाणी दारूचा पुरवठा होत असल्याचे आढळून आले. शेखूच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधिक दारू व्यापाऱ्यांवर कारवाई होईल, अशी चर्चा होती. परंतु एक महिना उलटूनही कारवाई झाली नाही त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

करीत आहेत पोलिसांचा सत्कार
शेखू गँगशी संबंधित लोक नेतागिरी करण्यात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी शेखूचा जवळचा एक व्यक्ती पोलिसांचा सत्कार करण्यवरून चर्चेत आला होता. त्याचे एका अधिकाऱ्याशी जवळचे संबंध आहे. शेखूवर मकोका लावून त्याच्या अधिकाऱ्याच्या हातून सत्कार करवून घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दारु दुकानावर पोलिसांची गर्दी
मेयो रुग्णालय चौकातील एक व्यापारी दारू तस्करीवरून संशयाच्या घेऱ्यात आहेत. त्याच्या दुकानावर नेहमीच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसून येते. अनेकदा तर ते शासकीय वाहनातूनही दारूच्या दुकानावर येतात. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता पोल उघडू शकले. परिसरातील महिला व नागरिकांनी याची तक्रारही केली आहे.

Web Title: Trust on liquor traders belonging to Shekhu gang in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.