सभागृह, लॉनमधील कार्यक्रमाला लागले ग्रहणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायंकाळ होताच विद्युत दिव्याभोवती मोठ्या संख्येत जमा होणाºया तुडतुड्यांनी नागपूरकरांना चांगलेच वैतागून सोडले आहे. दिव्यांच्या खाली बसण्याची सोय राहिलेली नाही. विशेष म्हणजे एखादे सभागृह किंवा लॉनमध्ये सुग्रास भोजनाला या किड्यांची दृष्ट लागली आहे. रात्री रस्त्यावरून उघड्या डोळ्याने वाहन चालविणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरील हे तुडतुडे आता घरातही येऊ लागल्याने सायंकाळ होताच दारे-खिडक्या बंद कराव्या लागत आहे.या किड्यांना ‘लीपहॉपर’ किंवा ‘जागीड किंवा मराठीत ‘तुडतुडे’ म्हणतात. तापमान कमी होऊन निर्माण होणारी आर्द्रता या किड्यांसाठी पोषक ठरते. सध्या शहरातील आर्द्रता वाढल्याने हे किडे जिकडे-तिकडे दिसून येत आहे, असे विद्याभारती कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले यांनी सांगितले. डॉ. टिपले म्हणाले, हे किडे साधारण जून ते आॅगस्ट या महिन्यात दिसून येतात. मात्र सध्याचे हे वातावरण या किड्यांना पोषक असल्याने पुन्हा एकदा हे किडे दिसू लागले आहेत. सध्याच्या स्थितीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळात या किड्यांचा प्रादुर्भाव सर्वात जास्त दिसून येतो. विशेषत: थंडी वाढायला लागताच उब घेण्यासाठी विद्युत दिव्याकडे हे किडे आकर्षित होतात. त्यांचे जीवनचक्र फार कमी दिवसांचे असते.यामुळे त्यांची उत्पत्ती होण्यास मदत होते. हे किडे माणसाच्या आरोग्याला हानीकारक नाही, कारण सकाळी या किड्यांना पक्षी टिपत असल्याचे किंवा मुंग्या लागलेल्या असल्याचे दिसून येते.तापमान किंवा थंडी वाढल्यास या किड्यांचे प्रमाण कमी होईल, असेही ते म्हणाले.तुडतुड्यांचे जीवन चक्र १६ दिवसांचेतुडतुड्यांचे जीवनचक्र साधारण १६ ते १८ दिवसांचे असते. या किड्यांना जोपर्यंत पोषक वातावरण मिळत नाही तोपर्यंत ते ‘डायपॉज’ म्हणजे अंडी किंवा ‘निम्फ’ मध्ये असतात. तापमान कमी होऊन आर्द्रता मिळताच हे पुन्हा दिसून येतात. हे किडे पानाच्या आत अंडी देतात. भारतासह बांगलादेश, तायवान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, जपान व चीन येथेही हे दिसून येतात.-डॉ. आशिष टिपलेविभाग प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग विद्याभारती कॉलेज, सेलू
तुडतुड्याने वैतागले नागपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:29 AM
सायंकाळ होताच विद्युत दिव्याभोवती मोठ्या संख्येत जमा होणाºया तुडतुड्यांनी नागपूरकरांना चांगलेच वैतागून सोडले आहे.
ठळक मुद्देरस्ते, घरात सर्वत्र किडेच-किडे :