नागपुरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 07:52 PM2020-07-24T19:52:40+5:302020-07-24T20:02:41+5:30

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू होती. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी पाऊल उचलले आहे. २५ व २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

Two-day 'Janata Curfew' in Nagpur | नागपुरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’

नागपुरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’

Next
ठळक मुद्देशनिवार, रविवार घरीच आनंदात घालवासर्व आस्थापना, दुकाने बंद राहणार, बाहेर पडाल तर कारवाईवृत्तपत्रे घरी येणार, बाजारपेठेत उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू होती. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी पाऊल उचलले आहे. २५ व २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यादरम्यान मनपाच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, दुकाने बंद राहणार आहेत. सकाळी दूध वितरण करण्यात येईल, शिवाय वर्तमानपत्रेदेखील सुरू राहणार आहेत.


लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर नागरिक बेजबाबदारपणे वागत होते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्फ्यूसह लॉकडाऊन लावण्याचा इशाराही दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनपा आयुक्तांसह महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नागपुरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा संदीप जोशी व तुकाराम मुंढे यांनी केली.


बाजारांकडे घेतली धाव

दोन दिवस जनता कर्फ्यू राहणार असल्याचे कळताच नागरिकांनी बाजारांकडे धाव घेतली. अचानक केलेल्या घोषणेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शनिवारी नागपंचमी असून बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी होते. त्यामुळे आवश्यक खरेदीसाठी दुकानांत गर्दी दिसून आली.

हे राहणार सुरू
वैद्यकीय सेवा
कचरा संकलन
पाणीपुरवठा
आपत्ती व्यवस्थान
वृत्तपत्र
दूध वितरण


कडेकोट बंदोबस्त राहणार
जनता कर्फ्यूमुळे शहरात कडेकोट बंद राहणार आहे. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या संबंधात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी .
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.
वस्त्यांमधील किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी.
आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा.
धान्य, खाद्यतेल, किराणा खरेदीवर ग्राहकांचा भर.
भाजीपाला बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.
इतवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीमुळे ट्रॉफिक जाम.
मद्य दुकाने बंद होणार असल्याने दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा.
नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर डेअरीमध्ये दूध आणि दही खरेदीसाठी गर्दी.
महाल चौकात गर्दी न करण्याचे मनपातर्फे जनता कर्फ्यूवर मार्गदर्शन.
लॉकडाऊनच्या भीतीने लोकांची आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी.

Web Title: Two-day 'Janata Curfew' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.