लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलगी (वय १७) घरात एकटी असल्याचे पाहून एका आरोपीने तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ आणि १५ मे रोजी दुपारी ही संतापजनक घटना घडली. आरोपीचे नाव संजय श्यामराव सयाम (वय ३७) आहे. तो मुळचा कान्होलीबारा (हिंगणा) येथील रहिवासी असून, सध्या वैशालीनगर झोपडपट्टीत राहतो.पीडित मुलीचे कुटुंबीय बालाघाटचे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते नागपुरात आले. बेलतरोडीत त्यांचे झोपडीवजा घर आहे. रोज सकाळी आई आणि वडील मोलमजुरीसाठी घराबाहेर जातात. ते रात्रीच परत येतात. पीडित मुलगी १४ मे च्या दुपारी १.३० वाजता तिच्या घरात एकटीच होती. ते पाहून आरोपी संजय सयाम मुलीच्या घरात शिरला आणि त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकी देऊन आरोपी निघून गेला. भीती आणि बदनामीच्या धाकाने मुलगी गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता आरोपी पुन्हा तिच्या घरात आला आणि त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार करून तिला गप्प राहण्यास बजावले. आरोपी पुन्हा असेच करू शकतो, हे ध्यानात आल्याने मुलीने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर गुरुवारी मुलीच्या पालकांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार नोंदवली. हवलदार गौतम बोरकर यांनी बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर धावपळ करीत गुरुवारी रात्री आरोपीला अटक केली.चिमुकलीशी अश्लील चाळेचार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या दुचाकीवर बसवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी नेल्सन अलेक्झांडर डिक्रूस (वय ६२, रा. हजारीपहाड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी १०.३० ला ही घटना घडली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नेल्सन डिक्रूसला अटक केली.
नागपुरात अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 9:23 PM
अल्पवयीन मुलगी (वय १७) घरात एकटी असल्याचे पाहून एका आरोपीने तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ आणि १५ मे रोजी दुपारी ही संतापजनक घटना घडली.
ठळक मुद्देजिवे मारण्याची धमकी : बेलतरोडीत गुन्हा, आरोपी गजाआड