कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिक अनेकदा तक्रार करीत असतात की, त्यांचे विजेचे मीटर खराब आहे. त्यामुळे रिडिंग अधिक होऊन विजेचे बिल अधिक येते. वीज वितरण कंपनी महावितरण मात्र ही बाब स्पष्टपणे नाकारते. परंतु लोकमतकडे असलेल्या अधिकृत रिपोर्टमध्ये मात्र विदर्भातील जवळपास दोन लाख (१ लाख ९७ हजार ७६३) विजेचे मीटर खराब असल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कंपनी हे मीटरसुद्धा बदलू शकलेले नाही. २५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९.९९ टक्के मीटर बदलवण्यात आले आहेत. दुसरीकडे ग्राहक मात्र विजेचे योग्य बिल भरण्यापासून वंचित आहेत.विदर्भात जवळपास ५० लाख विजेचे ग्राहक आहेत. वीज मीटर फिरण्याच्या गतीचा आढावा घेण्यात आला असता त्यात १ लाख ९७ हजार ७७६३ मीटरची गती खराब असल्याचे आढळून आले. काही मीटर अधिक वेगाने चालताना आढळले तर काही अतिशय संथ गतीने फिरत होते. अनेक नागरिकांनी याची तक्रार कंपनीकडे केली आहे. परंतु २५ नोव्हेंबरपर्यंत यापैकी १ लाख ४९ हजार ४९४ मीटर अजूनही लोकांच्या घरी लागलेले नाहीत. कंपनीने मागच्या एका महिन्यात केवळ १९, ७५३ मीटर बदलवले आहेत. ही संख्या एकूण मीटरच्या केवळ ९.९ टक्के इतकी आहे. जर याच गतीने काम सुरु राहिले तर खराब मीटर बदलवण्यासाठी दहा महिने लागतील. २८,२४५ मीटर सामान्य रिडींग देत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होताना दिसत नाही. विदर्भात सर्वाधिक मीटर यवतमाळ जिल्ह्यात खराब आहेत. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मीटर तपासण्यासाठी त्यांच्याकडे मशिनरी आहे. संशय येताच मीटरची तपासणी केली जाते. कंपनीने सुद्धा आकडेवारी समोर ठेवली आहे. यात अनेक मीटर जुने आहे. अधिकाºयांचा दावा आहे की, मीटर बदलण्याची गती सामान्य आहे. परंतु कंपनी जर मीटर खराब आहे, हे मान्य करीत असेल तर याचा फटका ग्राहकांनी का सहन करावा, असा प्रश्न आहे.
रोलेक्स, फ्लॅशचे मीटर खराब निघालेमहावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सांगितले की, रोलेक्स व फ्लॅश कंपनीचे मीटर खराब निघाले. कंपनीने असे मीटर चिन्हित केले आहे, जे ३० युनिटपर्यंत रीडिंग देत आहेत. कंपनी या मीटरला बदलवीत आहे. अगोदर त्या परिसरावर लक्ष दिले जात आहे, जिथे विजेची मागणी अधिक आहे. राज्यात मीटरला सर्वाधिक गतीने केवळ नागपूर परिक्षेत्रातच (विदर्भ) बदलविले जात आहे.
नागपुरातही १२,२६१ मीटर संशयास्पदनागपूर जिल्ह्यातही खराब मीटरची समस्या आहे. जिल्ह्यातील एकूण १२,२६१ मीटर संशयास्पद आढळून आले आहेत. कंपनीला यापैकी केवळ ११.८ टक्के (९३० मीटर) बदलविण्यात यश आले आहे. एसएनडीएलकडून मिळालेल्या भागातीलसुद्धा १०२२ मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. यापैकी केवळ ४३ मीटर बदलविण्यात आले आहेत.