नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:13 AM2020-08-06T01:13:01+5:302020-08-06T01:14:36+5:30
जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून १५ टक्के कर्मचाºयांची उपस्थिती शासनाने आवश्यक केली़ तरीही जि.प. च्या प्रत्येक विभागात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यासोबत अभ्यागतांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे जि.प.मध्ये प्रादुर्भाव वाढल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कोरोनात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातच कोरोनाने प्रवेश केला आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याला दोन दिवसांपासून बरे वाटत नसल्याने त्यांनी तपासणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर शिक्षण विभागातील आणखी एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळला. गेल्या काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये एक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह निघाला असता, त्यांच्या कक्षासह तहसील कार्यालय बंद करण्यात आले. आरोग्य विभागातील जे अधिकारी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या संपर्कातील जवळपास ४५ जणांनी बुधवारला रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट केली. त्यात सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आलेत. पण अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना विभागप्रमुखांकडे व्यक्त केल्या.