लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी आसीनगर व धंतोली झोन क्षेत्रातील फूटपाथवर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड तोडले. पथकाने आधी आसीनगर झोनमधील कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला लागून असलेल्या फूटपावरील फर्निचर विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. गमदूर बारजवळील राजा इंटरप्राइजेसचे शेड तोडण्यात आले. पुढे चार खंभा चौक येथील मिलन बिर्यानी सेंटरचे शेड व पक्के बांधकाम तोडले.खोब्रागडे हॉल व अशोक चौक लगतचे दोन शेड हटविण्यात आले. त्यानंतर शेरे पंजाब रेस्टॉरंट ते कमाल टॉकीज चौक यादरम्यानचे २८ अतिक्रमण हटविण्यात आले तसेच एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. बाबा बुद्धनगर येथील कपडे प्रेस करणाऱ्याचे दुकान हटविण्यात आले. पंचशीलनगर येथे सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून आकांक्षा नाईक व दुर्गा घरडे यांनी उभारलेले शौचालय तोडण्यात आले.दुसऱ्या पथकाने धंतोली झोन क्षेत्रातील बैद्यनाथ चौक ते गणेशपेठ बसस्थानक, आग्याराम देवी मंदिर चौक ते गांधीसागर तलावदरम्यानच्या फूटपाथवरील अनधिकृत ४२ शेड हटविण्यात आले. कारवाईदरम्यान चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.ही कारवाई सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात नितीन मंथनवार, विशाल ढोले, शादाब खान, आतिश वासनिक आणि पथकाने केली.
नागपुरात अनधिकृ त शेड तोडले; चार ट्रक साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:09 AM
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी आसीनगर व धंतोली झोन क्षेत्रातील फूटपाथवर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड तोडले.
ठळक मुद्देगांधीसागर तलाव परिसरात कारवाई करताना तणाव