नागपुरात  संपत्तीच्या वादातून काकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 09:42 PM2021-06-21T21:42:23+5:302021-06-21T21:42:50+5:30

Murder over property संपत्तीच्या वादातून पाच वर्षाच्या मुलाचा गळा आवळून हत्या करण्याची धमकी देणाऱ्या दारुड्या काकाची एका युवकाने पत्नीच्या मदतीने हत्या केली.

Uncle killed in property dispute in Nagpur | नागपुरात  संपत्तीच्या वादातून काकाची हत्या

नागपुरात  संपत्तीच्या वादातून काकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाच्या हत्येची देत होता धमकी : आरोपी दाम्पत्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संपत्तीच्या वादातून पाच वर्षाच्या मुलाचा गळा आवळून हत्या करण्याची धमकी देणाऱ्या दारुड्या काकाची एका युवकाने पत्नीच्या मदतीने हत्या केली. ही घटना रविवारी रात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगर येथे घडली. मृतकाचे नाव नामदेव लक्ष्मण निनावे (५५) आहे. तर आरोपी नितीन निनावे त्याची पत्नी माधुरी आहे.

नितीन चिकन सेंटरमध्ये काम करतो. मृतक नामदेव त्याचा काका आहे. नामदेव दारुडा आहे. तो अविवाहीत असून फुगे विकत होता. नामदेव ज्या घरी राहत होता, तिथे नितीन, त्याची पत्नी, पाच वर्षाचा मुलगा व त्याची आई सुद्धा राहते. नामदेव नेहमीच नितीन व त्याच्या कुटुंबियाला शिविगाळी करीत असे. तो घर सोडून जाण्यास धमकावित असे. नितीनने घरात वडीलाचा सुद्धा हिस्सा असल्याचे सांगून बाहेर पडण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद नेहमीच होत होता. डिसेंबर २०२० ला नामदेव ने नितीनच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. पाचपावली पोलीसांनी नामदेवच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तरीही नामदेवचा स्वभाव बदलला नाही. रविवारी रात्री ९ वाजता नामदेव ने पुन्हा नितीनसोबत वाद घातला. नितीनच्या पाच वर्षाच्या मुलाचा गळा कापण्याची धमकी त्याने दिली. नामदेवने यापूर्वी त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला होता. आता मुलाच्या हत्येची धमकी दिल्यामुळे दोघेही नवरा बायको संतापले. नितीनने पत्नीच्या मदतीने हातोड्याने वार करून नामदेवला गंभीर जखमी करून फरार झाला. नामदेवला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पाचपावली पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला अटक केली.

Web Title: Uncle killed in property dispute in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.