मामाची रक्कम, मावशीचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:38+5:302021-03-01T04:08:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भाचीच्या लग्नासाठी आलेल्या वधूच्या मामाच्या खिशातून रोकड तर मावशीच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लंपास केले. ...

Uncle's money, aunt's jewelry lampas | मामाची रक्कम, मावशीचे दागिने लंपास

मामाची रक्कम, मावशीचे दागिने लंपास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भाचीच्या लग्नासाठी आलेल्या वधूच्या मामाच्या खिशातून रोकड तर मावशीच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लंपास केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ फेब्रुवारीला घडलेल्या या दोन्ही चोऱ्या वेगवेगळ्या वेळी झाल्या.

मुकेश गोपीचंद गजभिये (वय ५०, रा. माैदा) यांची बहीण भूमिका मेश्राम काशीनगरात राहते. भूमिकाच्या मुलीचे लग्न असल्याने २२ फेब्रुवारीला त्यांच्याकडे पाहुणे जमले. त्यात भूमिका यांचे भाऊ मुकेश गजिभये आणि बहीण पुष्पा डोंगरे तसेच अन्य नातेवाईकांचा समावेश होता. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर ही मंडळी झोपी गेली. मध्यरात्रीनंतर गजभिये यांच्या कपड्याच्या खिशातून चोरट्याने २५,५०० रुपये काढून घेतले. भूमिका आणि मुकेश यांची बहीण पुष्पा यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला जाताना अंगावरचे दागिने बाहेर काढून ठेवले. ते ९० हजाराचे दागिने चोरट्याने लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लग्नघरी एकच खळबळ उडाली. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर गजभिये यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदविली. शनिवारी या प्रकरणात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Uncle's money, aunt's jewelry lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.