असंघटित श्रमिक जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:58+5:302021-01-23T04:09:58+5:30
कन्हान : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण विकास बोर्ड व संकल्प ग्रामोत्थान बहुउद्देशिय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ...
कन्हान : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण विकास बोर्ड व संकल्प ग्रामोत्थान बहुउद्देशिय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान नगर परिषदेच्या समाज भवनात असंघटित क्षेत्रातील विशेष अनुसूचित जाती श्रमिकांसाठी दोन दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते.
उद्घाटन नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक व अतिथी म्हणून राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्डाचे शिक्षण अधिकारी प्रमोद रत्नपारखी, नगरसेविका पुष्पा कावडकर, गुंफा तिडके, रेखा टोहणे, विनय यादव उपस्थित होते. प्रमाेद रत्नपारखी यांनी विभागाच्या संकल्पना, कार्य आणि उद्देशाबाबत तसेच केंद्र व राज्य शासनाच्यावतीने असंघटित क्षेत्रासाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी याेजनांची माहिती दिली. ‘जानकार बनिये, जागरुक रहिये’ या विषयावर दामोदर रामटेके यांनी मार्गदर्शन केले. वैशाली देविया यांनी महिलांची आत्मनिर्भरता आणि सक्षमीकरण यासाठी शासनाच्या विविध योजना व कौशल्य विकासासाठी शिक्षण व प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व स्वयंसहाय्य बचतगटाचा लाभ घेऊन महिलांनी सबळ होण्याचे आवाहन केले. प्रस्तावना अरविंद सिंह यांनी केले. संचालन प्रीती भूल यांनी केले तर प्रमिला घोडेस्वार यांनी आभार मानले.