विदर्भाला अवकाळीचा फटका; रामटेक तालुक्यात गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:59 AM2022-01-12T07:59:20+5:302022-01-12T07:59:29+5:30

नागपूर : जोरदार पावसाने  विदर्भातील नागपूर , अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः  झोडपले. विशेषतः सावनेर, ...

Untimely blow to Vidarbha; Hailstorm in Ramtek taluka, huge damage to crops | विदर्भाला अवकाळीचा फटका; रामटेक तालुक्यात गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान

विदर्भाला अवकाळीचा फटका; रामटेक तालुक्यात गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान

googlenewsNext

नागपूर : जोरदार पावसाने  विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः  झोडपले. विशेषतः सावनेर, कामठी, पारशिवनी व रामटेक तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता.  रामटेकसह परिसरात गारपिटीमुळे संत्रा, मोसंबी, भाजीपाला यांच्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले. मराठवाड्यातील नांदेड व लातूरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

सावनेर तालुक्यात संत्रा व मोसंबी, तसेच कापणीला आलेली तूर, कपाशी, गहू, हरभरा, टोमॅटो यासह अन्य भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रामटेकजवळील दाहोदा आणि घोटी या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे गारांचा मोठा थर साचला होता. काही ठिकाणी मोठी झाडेही कोसळली.

मंगळवारी भंडारा शहरासह चार तालुक्यांत पावसाची नोंद करण्यात आली. साेमवारी व मंगळवारी गडचिराेली जिल्ह्याला पावसाने झाेडपून काढले. साेमवारी रात्री व मंगळवारीही दमदार पाऊस  झाला. आजपर्यंत काेरडे पडलेले  नदी-नाले अवकाळी पावसाच्या तडाख्याने ओसंडून वाहू लागले. मिरची, कापूस व इतर रब्बी पिकांचे माेठे नुकसान झाले.  

गोंदियात २४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

गोंदिया जिल्ह्यात सकाळी १० वाजताच्या सुमारास सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. अवकाळी पावसामुळे २४ हजार हेक्टरमधील पिकांना फटका बसला आहे.
 

Web Title: Untimely blow to Vidarbha; Hailstorm in Ramtek taluka, huge damage to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर