आगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:01 AM2018-08-21T01:01:38+5:302018-08-21T01:02:21+5:30

भद्रावती येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारिप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आता नागपूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेची निवडणूकही भारिप बहुजन महासंघाने पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारिपचे प्रदेश महासचिव व नागपूरचे प्रभारी सागर डबरासे यांनी दिली.

Upcoming ZP Elections will be fought with full force | आगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार

आगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार

Next
ठळक मुद्देसंघटनेचा आढावा : प्रदेश महासचिव सागर डबरासे यांची माहिती


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भद्रावती येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारिप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आता नागपूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेचीनिवडणूकही भारिप बहुजन महासंघाने पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारिपचे प्रदेश महासचिव व नागपूरचे प्रभारी सागर डबरासे यांनी दिली.
प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डबरासे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या नागपूर जिल्हा व शहर संघटनेचा सोमवारी आढावा घेतला. रामबाग येथील भारिपच्या कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजू लोखंडे, शहराध्यक्ष विनोद गजभिये, महिला आघाडीच्या अध्यक्षा वनमाला उके, उपाध्यक्ष सुहासिनी शंभरकर, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, शिवकुमार मेश्राम, नीतेश जंगले, अतुल शेंडे, गौतम शेंडे, प्रल्हाद गजबे, प्रशांत चव्हाण, रवी वंजारी, आनंद बागडे, अजय सहारे, संतोष मोटघरे, भीमराव भूषण, अशोक वासनिक, सहदेव मेश्राम, कल्याण अडकने, हर्षद गजभिये, गंगाधार पाटील, प्रशांत नगरकर, सचिन मेश्राम, अतुल शेंडे यांच्यासह नागपुरातील १२ विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभानिहाय संघटनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होत आहे. त्या निवडणुका भारिप पूर्ण ताकदीने लढवणार असून त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागावे. त्यासाठी पक्षात नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहनही यावेळी डबरासे यांनी केले.

Web Title: Upcoming ZP Elections will be fought with full force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.