लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली. यावेळी त्यांनी १७ मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना दिले. यात विनाअनुदानित व रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत, कोरोनात ड्युटीवर मृत्यू झाल्यास शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत करावी, शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर असावी, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंग मशीन आदी साहित्य खरेदीसाठी विशेष अनुदान द्यावे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, राज्य संयुक्त कार्यवाह दिलीप तडस, प्रा. सपन नेहरोत्रा, प्रा. किशोर वरभे, भारत रेहपाडे, दीपक नागपुरे, देवदास नंदेश्वर, धीरजलाल भारद्वाज, अरुण भोयर आदी उपस्थित होते.
ऑनलाईन शिक्षणासाठी टीव्ही, रेडिओ वपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:33 AM
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली. यावेळी त्यांनी १७ मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना दिले.
ठळक मुद्दे शिक्षक भारतीतर्फे शिक्षण उपसंचालकांना निवेदन