ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 08:02 PM2023-06-01T20:02:20+5:302023-06-01T20:02:47+5:30

Nagpur News आंबेडकरी चळवळीतील स्त्रिवादी लेखिका, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी माेक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Veteran thinker Kumud Pavde merges with Anant | ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन

ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन

googlenewsNext

नागपूर : आंबेडकरी चळवळीतील स्त्रिवादी लेखिका, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी माेक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अमिताभ पावडे, डॉ. अभिजित पावडे, डॉ.अपूर्व पावडे यांनी अग्नी दिला. कुमुदताई अनंतात विलीन झाल्या.

यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेत या परिसरात शोकसभा घेण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना, ज्येष्ठ आंबेडकरवादी आणि बहुजन समाजाला जागृत करणाऱ्या कार्यकर्त्या कुमुदताई यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक कार्याची माेठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. प्रा. कवाडे यांनी लाॅंगमार्चमध्ये केलेल्या मार्गदर्शनापासून कुमुदताईंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. नागपूरमधील संस्कृत भाषेची पहिली महिला पंडित म्हणून ओळख असलेल्या कुमुदताईंनी क्रांतिकारी कार्य केल्याचे ते म्हणाले. त्या काळात माेतीराम पावडे यांच्याशी केलेला आंतरधर्मीय विवाह खुप गाजला हाेता. मात्र आंतरजातीय विवाहाचा प्रचार करणाऱ्या कुमुदताईंनी स्वत:पासून सुरुवात करून समाजाला दिशा दिल्याचे ते म्हणाले. महिलांच्या व्यथा मांडणारे लिखाण करणाऱ्या लेखिका डॉ. कुमुदताई पावडे यांचे निधन मनाला चटका लावून गेले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी आणि बहुजन समाजाची हानी झाल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

शाेकसभेत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहुरे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक जामगडे, आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर, माजी जिल्हाधिकारी वसंत खोब्रागडे, महाकवी सुधाकर गायधनी, महाकवी इ.मो.नारनवरे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, रिपाई नेते भूपेश थुलकर, दलित नाटककार दादाकांत धनविजय, डॉ.अलंकार रामटेके, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, नाटककार प्रभाकर दुपारे, नाटककार डॉ. सतीश पावडे, प्रा. निशा शेंडे-पावडे, कवी प्रसेनजित ताकसांडे, विठ्ठलराव कोंबाडे, प्रा. सरोज आगलावे, डॉ. सरोज डांगे, उषा बौद्ध, शरद पाटील, ॲड. मिलिंद गाणार, मिलिंद फुलझेले, राष्टसंतभक्त ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, नरेश वहाणे, राहुल परुळकर, डॉ. प्रशांत बागडे, सुमेध कांबळे, नाटककार संजय जीवने, वंदना जीवने, सुधाकर सोमंकुवर, पॅंथर प्रकाश बनसोड, सुनील सारीपुत्त, करुणकुमार कांबळे, सुरेश मून, प्रदीप मून, राहुल मून, उत्तम हूमणे, रवी शेंडे, नरेश मेश्राम, विठ्ठल कोंबाडे, नाट्यदिग्दर्शक कमल वागधरे, प्रा. इंद्रजित ओरके, धर्मेश फुसाटे, डॉ. सच्चिदानंद दारुंडे, प्रा.तुळसा डोंगरे, प्रा. सुनील रामटेके, चंद्रहास सुटे, प्रभू राजगडकर, सिद्धार्थ ढोके, डॉ. रमेश राठोड, संजय सायरे,नरेश मेश्राम, छाया खोब्रागडे, अशोक जांभुळकर आदी उपस्थित हाेते.

Web Title: Veteran thinker Kumud Pavde merges with Anant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.