शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

तपासणीदरम्यान विदर्भात पाऊण कोटीची रोकड पकडली

By admin | Published: September 30, 2014 12:34 AM

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणीदरम्यान विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तब्बल पाऊण कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे.

निवडणूक पथकाची कारवाई : अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील घटनानागपूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणीदरम्यान विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तब्बल पाऊण कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे. मात्र अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी नाकाबंदीदरम्यान दोन वाहनांत आढळून आलेली ४० लाखांची रक्कम स्थानिक बँकेची असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सोडून दिली. सोमवारी दुपारी अचलपूर नाक्यावर अमरावतीकडून परतवाड्याकडे जाणाऱ्या एम.एच.२७ ऐ.जी. ८७२६ या वाहनात पोलिसांना ५ लाख ८९ हजार ५०० रुपये असल्याचे आढळून आले. ही रक्कम कंत्राटदार अहमद नासीर अहमद रऊफ यांच्याकडे होती. पोलिसांनी त्याला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नेले होते. पकडण्यात आलेली रक्कम सुसर्दा येथील समाज मंदिराच्या बांधकामासाठी आणली असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरु होती. तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी नाकाबंदी दरम्यान दोन वाहनांत ४० लाखांची रक्कम आढळून आली मात्र ती रक्कम स्थानिक बँकेची असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सोडून दिली. सोमवारी अर्जुननगर टी-पाइंटवर पोलिसांनी नाकबंदी करुन वाहनाची तपासणी केली. यावेळी एमएच-२७-बीई- ३३९९ या वाहनात शारदा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेची ३० लाखांची रोकड पोलिसांना आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत ही रोकड बँक शाखेची असल्याचे स्पष्ट झाल्याने वाहन रोकडसह सोडून देण्यात आले. त्याचप्रमाणे इको बँकेच्या एम.एच.२७-ए.सी. ८५८३ या वाहनात १० लाखांची रक्कम आढळून आली. पोलिसांनी रक्कमेची शहानिशा करुन त्या वाहनाला सोडून दिले.चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर- चंद्रपूर मार्गावरील वरोरा तालुक्यातील खांबाडा गावाजवळ निवडणूक तपासणी पथकाने एका वाहनातील वीस लाख रुपयांची रोकड जप्त केली. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर- चंद्रपूर मार्गावरील खांबाडा गावाजवळील तपासणी पथकाने एमएच एसी २४०३ या वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये ठेवलेल्या काळ्या बॅगमध्ये २० लाख रुपये आढळून आले. ही रोख वाहनामध्ये बसलेल्या इंदोर येथील राजेश कल्यानमल गर्ग यांची असल्याची कबुली निवडणूक पथकाला दिली. सदर रक्कम टोल टॅक्सच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तसेच रस्ता दुरुस्तीकरिता लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीबाबत असल्याचे राजेश गर्ग यांनी आपल्या बयाणात नमूद केले आहे. निवडणूक पथकाने वाहन चालक महेश तुळशिराम धकाते रा. जयताडा नागपूर याचेही बयान नोंदविले आहे. रक्कमेबाबत निवडणूक पथकाला घटना स्थळी कागदपत्र सादर करुन शकले नसल्याने सदर रक्कम वरोरा येथील कोषागारामध्ये जमा करण्यात आली आहे. रकमेची तपासणी करण्याकरिता आयकर विभागाचे अधिकारी वरोरा शहरात दाखल झाले आहे.तिकडे यवतमाळ जिल्ह्यात पिंपळगाव चेकपोस्टवर बसमधील एका प्रवाशाजवळ तब्बल १० लाख ३० हजार ७०० रुपये रोख आढळून आले. ही रक्कम आर्णी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. ही रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी नेली जात होती, हे मात्र कळू शकले नाही. मोहंमद जुबेर शेख रा. कुरूम ता. मूर्तिजापूर जि. अकोला असे रोकड आढळलेल्या तरूणाचे नाव आहे. तो अदिलाबाद येथून नांदगाव येथे जात होता. त्यासाठी हैदराबाद-नागपूर बसमध्ये प्रवास करीत होता. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर सोमवारी वाहनांची तपासणी सुरू असताना या बसची तपासणी करण्यात आली त्यावेळी मोहंमद जबेर शेख जवळ १० लाख ३० हजार ७०० रुपये रोख आढळून आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस.बी. खंडारे, बळीराम शुक्ला, मंडळ अधिकारी चांदेकर यांनी केली. ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी जात होती हे मात्र कळू शकले नाही. विशेष म्हणजे, रविवारी वाहनांची तपासणी सुरू असताना दोन गांजा तस्कारांना अटक करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)