गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!अभिनेता आमिर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे ‘ड्राय झोन’ गावात ‘वॉटर कप’ स्पर्धा घेण्यात येत आहे. याअंतर्गत गावाची तहान गावातच भागली जावी, यावरच भर देण्यात येत आहे. त्यामुळे तहानलेल्या गावात पानवठे - बंधारे, बांध तयार करणे, पाण्याचे स्रोत शोधून त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि विशेष म्हणजे ही सर्व कामे लोकसहभागातून करणे हा प्रमुख उद्देश या ‘वॉटर कप’चा आहे.नरखेड तालुक्यातील तब्ब्ल ६६ गावे या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहे. संबंधित गावात जोरदार तयारी करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने जे काम करता येईल, त्यासाठी स्वत:हून पुढे येत आहे. एवढेच काय तर त्यात वयोवृद्ध आणि बच्चेकंपनीही मागे नाही. अख्खे गाव सामूहिक श्रमदान करून बांध-बंधारे बांधण्याच्या कामात व्यस्त आहे. याच तालुक्यातील खैरगावात अशाप्रकारचे चित्र असून ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटतेबद्दत स्तुतिसुमने उधळली जात आहे.सामूहिक श्रमदानासोबतच खैरगाव येथील कामासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठीही ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. त्यातून पै-पै करून बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पंकज देवते, प्रकाश गणोरकर, भूषण बेलसरे, सुधाकर काळे, कृष्णाराव खरळकर, गणेश चौधरी, विलास कोरडे, अजय बारमासे, चेतन खुरळकर, रामराव बेलसरे, रवींद्र सोरते, किसना सावरकर, किशोर अलोने, दिलीप अकर्ते यांच्यासह इतर ग्रामस्थांचा आर्थिक हातभार लागला.पुरस्कारापेक्षा गावात पाणी महत्त्वाचे!
पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:32 PM
नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!
ठळक मुद्देसामूहिक श्रमदान अन् आर्थिक हातभारखैरगावमध्ये वयोवृद्धांपासून बच्चेकंपनीही उतरली मैदानात