लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात अन् त्यांची परीक्षा घेतात असे चित्र दिसून येते. मात्र नागपुरात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विद्यार्थ्यांनीच प्रश्नांचे ‘बाऊन्सर्स’ टाकून त्यांना अक्षरश: हैराण केले. महाराष्ट्रात ‘सीबीएसई’ शाळांत मराठीचे शिक्षण अनिवार्य का नाही हा प्रश्न तर तावडे यांना अडचणीत टाकणाराच होता. यावर राज्यातील ‘सीबीएसई’ शाळांमध्ये सातवीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य करणार अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिली.शालेय शिक्षण विभागाच्या ‘थेट संवाद’ या उपक्रमांतर्गत तावडे यांनी गुरुवारी शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विविध मुद्यांवर विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. इंग्रजी शाळांमध्ये मराठीला बंदी का? असा प्रश्नच एका विद्यार्थ्याने त्यांना विचारला. राज्यातील ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ शाळांत मराठी शिकविल्या जात नाही. त्यामुळे या शाळांमधे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे सक्तीचे करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच कार्यवाही होईल, असे तावडे यानी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना तावडे यांना मराठी शाळा, दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धती इत्यादी मुद्यांवर विचारणा केली. प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे तावडे यांनी सांगितले. नागपूरमधील सरस्वती विद्यालय, हडस विद्यालय, धरमपेठ हायस्कूल, टाटा पारसी हायस्कूल, जिंदाल विद्यामंदिर, राजेंद्रनगर हायस्कूल, परांजपे हायस्कूल इत्यादी शाळांतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.‘होम स्कूलिंग’बाबत विचार सुरूक्रीडा क्षेत्रात चांगले खेळाडू घडावे यासाठी काय प्रयत्न सुरू आहे, अशी विचारणा एका विद्यार्थ्याने केली. यावर तावडे यांनी ‘होम स्कूलिंग’बाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. सांस्कृतिक किंवा क्रीडा क्षेत्रात ‘करिअर’ची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन बोर्ड’ तयार करण्यावर विचार सुरू आहे. या बोर्डात प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज राहणार नाही. ‘होम स्कूलिंग’च्या माध्यमातून ते शिकू शकतील व वर्षातून त्यांची दोनदा परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.गणिताला कलेचा पर्याय?गणिताची विद्यार्थ्यांना भीती वाटते. याबाबत शिक्षण विभाग विविध पर्यायांवर विचार करत आहे. आठवीनंतर विद्यार्थ्यांना गणिताऐवजी कला हा विषय पर्याय म्हणून देता येईल का याची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन वर्षात याबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल.आठवड्यात एकदा पाळा ‘नो गॅजेट डे’यावेळी तावडे यांनी तंत्रज्ञानाबाबतदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सद्यस्थितीत तंत्रज्ञानाने आपल्याला घेरले आहे व अनेक चांगल्या गोष्टी विसरत चाललो आहे. एकाप्रकारे ‘सायबर’ गुलामीत अडकत चाललो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एकदा तरी ‘नो गॅजेट डे’ पाळला पाहिजे. याची सुरुवात नागपुरातूनच झाली पाहिजे व राज्यभरात यातून आदर्श प्रस्थापित केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. शाळांनी दप्तराचे ओझे वाढविले तर थेट मला थेट ‘ई-मेल’ करा, असेदेखील ते म्हणाले.
राज्यातील सीबीएसई शाळांत मराठी सक्तीची करणार : विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 8:38 PM
एरवी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात अन् त्यांची परीक्षा घेतात असे चित्र दिसून येते. मात्र नागपुरात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विद्यार्थ्यांनीच प्रश्नांचे ‘बाऊन्सर्स’ टाकून त्यांना अक्षरश: हैराण केले. महाराष्ट्रात ‘सीबीएसई’ शाळांत मराठीचे शिक्षण अनिवार्य का नाही हा प्रश्न तर तावडे यांना अडचणीत टाकणाराच होता. यावर राज्यातील ‘सीबीएसई’ शाळांमध्ये सातवीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य करणार अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिली.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या शाळेत शिक्षणमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती