नागपूरमध्ये ढाब्यांवर सर्रास ‘चिअर्स’ पार्ट्या, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:47 AM2020-07-06T05:47:18+5:302020-07-06T05:47:55+5:30
सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाकी, दुचाकी वाहने थांबायला लागतात. जेवणाची आॅर्डर देऊन त्यासोबत मद्यप्राशनही सुरू असते.
- प्रवीण खापरे
नागपूर : कोरोनामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे बंद असताना महामार्गावर मात्र सर्रासपणे प्रशासनाच्या डोळ्यासमोर नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. महामार्गावरील ढाबे रात्री बिनधास्त सुरू आहेत. ‘चिअर्स पार्ट्यां’च्या झगमगाटाचा हा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंंग आॅपरेशन’मधून उघड झाला आहे.
सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाकी, दुचाकी वाहने थांबायला लागतात. जेवणाची आॅर्डर देऊन त्यासोबत मद्यप्राशनही सुरू असते. पहाटे ५ वाजतापर्यंत हा प्रकार सुरू असतो. मद्यशौकिनांसाठी ढाब्यांवर मद्याचा प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे. हा साठा जवळच एका खड्ड्यात पुरुन ठेवला जातो. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावातही स्वयंपाकाबाबतही कुठलीच काळजी घेतली जात नव्हती, असे दिसून आले.