बेसा येथे झाला विठूनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:29+5:302021-07-21T04:07:29+5:30
- २१ फूट विठ्ठल मूर्तीपुढे रिंगण, हरिपाठ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आषाढी एकादशीच्या पर्वावर विश्व वारकरी सेवा संस्थेच्या ...
- २१ फूट विठ्ठल मूर्तीपुढे रिंगण, हरिपाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आषाढी एकादशीच्या पर्वावर विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वारकऱ्यांनी बेसा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर (स्वामीधाम) येथे संतधाम उद्यानात उभारण्यात आलेल्या २१ फूट उंच विठ्ठल मूर्तीपुढे विठूनामाचा गजर करत पर्व साजरे केले.
ह.भ.प. उमेश महाराज बारापात्रे यांच्या नेतृत्त्वात वारकरी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानोबा, तुकोबाच्या गजरासह पांडुरंगांचे नामस्मरण करत भजन, पावल्या व रिंगण सोहळा साजरा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप कोहळे, सुरेखा ढोरे, स्नेहल काळे, कविता डुंभरे, विद्या नांदेकर, अनुराधा रिसालदार, निनावे, कचोरे उपस्थित होते.
संतधाम येथे या वर्षी विठ्ठलाची २१ फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. यासोबतच गजानन महाराज, साईबाबा, जगदगुरू तुकाराम महाराज, तुळशी वृंदावन डोक्यावर धारण करणारी जनाबाई यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वावर येथे भक्तांनी दर्शन घेतले.
.....................