लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. या टप्प्यात ३० जागांचा समावेश असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण १९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २१ महिलादेखील आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकात या ३० जागांपैकी २७ ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या ६५९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
असे राहणार मतदान
एकूण जागा - ३०
मतदार - ७३,८०,४९२
उमेदवार - १९१
मतदान केंद्र - १०,२८८