पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:20 PM2018-06-06T23:20:10+5:302018-06-06T23:20:44+5:30
पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत समजावून सांगण्याच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत समजावून सांगण्याच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. नागपूर परिक्षेत्रातील अकोला, अमरावती, चंद्र्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाचही परिमंडळाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
अनियमितपणे वीज बिल भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ प्रभावाने खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना करतानाच आपली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडणाºया अधिकाºयांना कारणे दाखवा नोटिसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी मंडळनिहाय मागणी, महसूल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतानाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांवर नाराजी व्यक्त करीत, या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, सुहास रंगारी, अरविंद भादीकर, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात आदी उपस्थित होते.
विस्तारित ग्राम स्वराज्य अभियान
ग्राम स्वराज्य अभियानात नागपूर परिक्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून, विदर्भातील वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यात १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियानाचा विस्तारित कार्यक्रम राबवायचा आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांतील ५,२६० तर वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांतील १४२३ घरकुलांना सौभाग्य योजनेतून वीज जोडण्या द्यायच्या आहेत. हे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी सर्व संबंधितांना देण्यात आल्या.