सक्करदरा, जयताळा जलकुंभांचा पाणीपुरवठा ३० जूनला बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:01 PM2023-06-29T13:01:51+5:302023-06-29T13:02:18+5:30
जलकुंभांच्या आंतरजोडणीकरिता शटडाउन
नागपूर : महानगरपालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या नेहरूनगर झोनमधील वंजारीनगर जलकुंभ व लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा जलकुंभाच्या आंतरजोडणीकरिता शुक्रवार ३० जून रोजी शटडाउन घेण्याचे ठरविले आहे. यामुळे ४ जलकुंभांतून होणारा पाणीपुरवठा बाधित होणार आहे.
नवीन वंजारीनगर जलकुंभाची ९०० बाय ५०० व्यासाच्या जलवाहिनीशी आंतरजोडणी करायची असून, त्यासाठी १२ तासांचा तसेच जयताळा जलकुंभाची ५०० बाय ५०० व्यासाच्या जलवाहिनीशी आंतरजोडणीकरिता २४ तासांचा तांत्रिक शटडाउन करण्यात येणार आहे.
- शटडाउनमुळे येथे होणार पाणीपुरवठा
नेहरूनगर झोन : शटडाउन (सकाळी १० ते रात्री १०)
सक्करदरा १ आणि २ जलकुंभ : महालक्ष्मीनगर १, २ आणि ३, लाडीकर लेआउट, चक्रधरनगर, बँक कॉलनी, जवाहरनगर, भांडेप्लॉट, सेवादलनगर , सोळंकीवाडी
सक्करदरा ३ जलकुंभ : राजीव गांधी नगर, नवीन सुभेदार लेआउट, बिडीपेठ, आशीर्वादनगर, ताजअम्मा कॉलनी, बँक कॉलनी, इंदिरा गांधी सभागृहाचा भाग, गुरुदेवनगर, रुक्मिणीनगर, संजय गांधीनगर, श्रीरामनगर.
लक्ष्मीनगर झोन : शटडाउन (जून ३० सकाळी १० ते जुलै १ सकाळी १०)
जयताळा जलकुंभ : रमाबाई आंबेडकरनगर, जुना जयताळा, एकात्मतानगर, दादाजीनगर, पूजा लेआउट, पाखीले लेआउट, ठाकरे लेआउट, भांगे लेआउट, नितनवरे लेआउट, वूडलँड सोसायटी, दाते लेआउट, साई लेआउट, सत्यसाई बाबानगर, शारदानगर, वडस्कर लेआउट, मालपुरे लेआउट, झाडे लेआउट, शिवविहार, फोर्थ इंडिया लेआउट, तुलसीविहार, ससाणे लेआउट, डंभारे लेआउट, कबीरनगर, पंचवटीनगर, महाजन लेआउट, संघर्षनगर, स्वस्तिकनगर.