विदर्भातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:32 AM2019-07-24T11:32:22+5:302019-07-24T11:32:45+5:30

पावसाच्या दांडीमुळे नागपूर तालुक्यासह विदर्भातील धान उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

On the way to the drying up of paddy in Vidarbha | विदर्भातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर

विदर्भातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाच्या दांडीमुळे नागपूर तालुक्यासह विदर्भातील धान उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. यावर्षी १८ जून ते २३ जुलैदरम्यान फक्त २४१ मिमी पाऊस पडला. तर याच अवधीत गेल्या चार वर्षांत सदर आकडेवारीच्या दुपटीने पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांचे धानाची पऱ्हे सुकले. काही सुकण्याच्या मार्गावर आहेत, तर उर्वरित कसेबसे जगविण्याचा आटापिटा सुरू असल्याचेच चित्र आहे. रोवणी केली तरी हाती पीक येईपर्यंत धान पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. अडचणीच्या वेळी पिकाला जीवदान देणारे पाणी पेंच प्रकल्पातून मिळेल काय? अशा एक ना अनेक विचारांनी शेतकरी प्रचंड तणावात आला आहे.
पेंच प्रकल्पातील पाण्याच्या आशेवर तालुक्यात एकूण ३४ हजार ९४२ हेक्टर आर क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे २९ हजार २१३ हेक्टर क्षेत्रात धान पिकासाठी बांध्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्प पिण्याचेही पाणी देऊ शकत नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची दडी, पावसाने उशिरा हजेरी लावणे, हे नवीन नाही.

Web Title: On the way to the drying up of paddy in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती