लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भारतातील ज्या राज्यांना वाघ हवे असतील, त्यांना ते द्यायला आम्ही तयार आहोत. केंद्र सरकारची परवानगी घेऊन वाघ पाठविले जातील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
चंद्रपूर हा जगातील सर्वांत अधिक वाघ असलेला जिल्हा आहे. लोक वाघ पाहायला येतात व परत जातात; परंतु, या वाघांचा त्रास परिसरातील लोकांना, होतो. तेव्हा आता व्याघ्र संरक्षण नव्हे तर मानव संरक्षण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
घुसखोरी करणाऱ्या हत्तींना बाहेर काढणार
- केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम येथून हत्ती महाराष्ट्रात येत आहेत. ते मोठ्या प्रमाणात धानशेतीची हानी करत आहेत.
- शेतीच्या औजारांसह हत्ती घरांचीही हानी करत आहेत. अन्य राज्यांतून येणाऱ्या हत्तींना पुन्हा त्या राज्यांत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"