गहू, तुरीच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:05+5:302021-03-08T04:09:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : कापणी करून ठेवलेल्या गहू व तुरीच्या गंजीला अचानक आग लागली. त्यात शेतकऱ्याचे अंदाजे दाेन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : कापणी करून ठेवलेल्या गहू व तुरीच्या गंजीला अचानक आग लागली. त्यात शेतकऱ्याचे अंदाजे दाेन लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना पारशिवनी तालुक्यातील माहुली शिवारात शुक्रवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली.
माहुली शिवारात महिला शेतकरी रामेश्वरी कंचन गिरी यांच्या मालकीची शेती असून, नुकतेच त्यांनी गहू व तूर पिकाची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली हाेती. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेतातील गंजीला अचानक आग लागली. त्यात संपूर्ण पीक जळून खाक झाले. शिवाय, बाजूला ठेवलेला जनावरांचा चारा भस्मसात झाला. शनिवारी रामेश्वरी गिरी या शेतात गेल्या असता, पिकांची गंजी जळून खाक झाली हाेती. याबाबत त्यांनी पारशिवनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पाेलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीच्या घटनेमुळे गिरी यांचे अंदाजे दाेन लाख रुपयाचे नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्यास भरपाई द्यावी, अशी मागणी सुरेश भगत, चंद्रभान इंगाेले, अविनाश खडतकर, कंचन गिरी, मनाेज गिरी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.