पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:27 AM2018-12-08T00:27:50+5:302018-12-08T00:28:32+5:30
सत्र न्यायालयाने पत्नीस जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीस जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
हरीप्रसाद सत्तू यादव (५०) असे आरोपीचे नाव असून तो वडगाव (गुजर), ता. हिंगणा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव सिराजू ऊर्फ वैजयंती (३५) होते. आरोपीने वैजयंतीला जाळून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे शव सतीश जैन यांच्या पडीक शेतातील विहिरीत फेकून दिले. ही घटना ८ आॅक्टोबर २०१६ रोजी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बारापात्रे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. एस. जे. बागडे यांनी कामकाज पाहिले.