उपराजधानीतील उकाडा कमी होणार? नागपूर ४६.३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:01 AM2020-05-29T11:01:05+5:302020-05-29T11:01:28+5:30
विदर्भात बुलडाणा येथे सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो व विदर्भात काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवतपा सुरू असताना गुरुवारी परत नागपूरचे तापमान वाढले. बुधवारच्या तुलनेत ०.३ अंश सेल्सिअसची वाढ दिसून आली व ४६.३ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात बुलडाणा येथे सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो व विदर्भात काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
सोमवारपासून सातत्याने तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या वरच आहे. बुधवारी पारा काहीसा घसरल्याने गुरुवारीदेखील तशीच स्थिती राहील असा अंदाज होता. मात्र सकाळपासून गरमी जाणवायला लागली. शहरात कमाल ४६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३.१ अंश सेल्सिअसहून अधिक होते. किमान २९.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. नागपुरात शुक्रवारीदेखील उष्णतेची लाट असेल. मात्र शनिवारपासून पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३ जूनपर्यंत तशीच परिस्थिती राहू शकते. चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ४५.५ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ येथे ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील तापमान
केंद्र कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर ४६.३
ब्रह्मपुरी ४४.८
वर्धा ४५.५
चंद्रपूर ४६.०
गडचिरोली ४४.२
अकोला ४४.२
अमरावती ४३.६
यवतमाळ ४५.३
गोंदिया ४३.८
बुलडाणा ४६.६
वाशिम ४३.०