मनसर शाखेतून १७.८० लाखांची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:00+5:302021-09-22T04:11:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : खाेटी कागदपत्रे सादर करून रामटेक तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या शीतलवाडी व मनसर शाखेतून पीककर्जाची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : खाेटी कागदपत्रे सादर करून रामटेक तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या शीतलवाडी व मनसर शाखेतून पीककर्जाची उचल करण्यात आली असून, या प्रकरणात दाेघांना अटक करण्यात आली आहे. मनसर शाखेतील हा घाेटाळा सन २०१३-१४ मधील असून, खाेट्या कागदपत्रांच्या आधारे या शाखेतून १७ लाख ८० हजार रुपये पीककर्जाची उचल करण्यात आली हाेती. या काळात आपण शाखा व्यवस्थापकपदी नव्हते, अशी माहिती शाखा व्यवस्थापक पल्लवी बाेबडे यांनी दिली.
बँक ऑफ इंडियाच्या शीतलवाडी शाखेतून पीककर्जापाेटी १ काेटी ४० लाख रुपयांची उचल करण्यात आली. या प्रकरणात १४७ जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, यातील संजय रामदास देशमुख (५०, रा. शीतलवाडी, ता. रामटेक) व मोहनलाल हरिश्चंद्र भलावी (४५, रा. बेलदा, ता. रामटेक) यांना अटक करण्यात आली. याच काळात (२०१३-१४) बँक ऑफ इंडियाच्या मनसर शाखेतून खाेट्या कागदपत्राच्या आधारे १७ लाख ८० हजार रुपयांच्या पीककर्जाची उचल करण्यात आली. या काळात आपण शाखा व्यवस्थापक नव्हते. सन २०१९ मध्ये या शाखेत व्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर हा प्रकार आपल्या लक्षात आला. त्यामुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आणि त्यांच्या सूचनेवरून रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली, अशी माहिती शाखा व्यवस्थापक पल्लवी बाेबडे यांनी दिली.