विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:28 PM2019-07-25T23:28:57+5:302019-07-25T23:30:17+5:30

शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर वाहतूक परिमंडळ सीताबर्डीने कारवाई केली. विशेष म्हणजे, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांचे पोलिसांनी समुपदेशनही केले.

Without Helmet : Action against 248 drivers in Nagpur | विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई

विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक परिमंडळ सीताबर्डी : दुचाकी चालकांचे समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर वाहतूक परिमंडळ सीताबर्डीने कारवाई केली. विशेष म्हणजे, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांचे पोलिसांनी समुपदेशनही केले.
पोलीस उपआयुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे नुकतीच शहर वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी सर्व वाहतूक परिमंडळ कार्यालयांना नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालकांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच कारवाई करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावूनही सांगा, अशा सूचनाही केल्या. याची दखल घेत वाहतूक परिमंडळ सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी बुधवारी पंचशील चौक, महाराजबाग चौक, झिरो मॉईल व भरतनगर अमरावती रोड या भागात पथक तैनात करून विशेष मोहीम राबवली. यात विना हेल्मेटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४८ चालकांवर कारवाई करण्यात आली. भांडारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर विशेष कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सतत सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. ही कारवाई भांडारकर यांच्यासह सहपोलीस निरीक्षक सोनटक्के, विनोद वाघ, तायडे, बागडे, राजमोहन सिंग यांच्यासह २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Without Helmet : Action against 248 drivers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.