नागपूर मनपात विनानिविदा २१ लाखांच्या गोवऱ्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:30 PM2018-06-02T22:30:25+5:302018-06-02T22:30:42+5:30
नागपूर शहरातील दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी महापालिकेतर्फे शेणाच्या गोवऱ्या मोफत पुरविल्या जातात. गोवऱ्याचा पुरवठा कं त्राटदारामार्फत केला जातो. परंतु २९ सप्टेंबर २०१६ रोजी याबाबतचे कंत्राट संपले. असे असूनही गेल्या २० महिन्यांपासून विनानिविदा कंत्राटदार गोवऱ्याचा पुरवठा क रीत आहे. निविदा न काढता कंत्राटदाराने गोवऱ्याचा पुरवठा करून घोळ घातल्याने महापालिकेत नवा वाद निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी महापालिकेतर्फे शेणाच्या गोवऱ्या मोफत पुरविल्या जातात. गोवऱ्याचा पुरवठा कं त्राटदारामार्फत केला जातो. परंतु २९ सप्टेंबर २०१६ रोजी याबाबतचे कंत्राट संपले. असे असूनही गेल्या २० महिन्यांपासून विनानिविदा कंत्राटदार गोवऱ्याचा पुरवठा क रीत आहे. निविदा न काढता कंत्राटदाराने गोवऱ्याचा पुरवठा करून घोळ घातल्याने महापालिकेत नवा वाद निर्माण झाला आहे.
विनानिविदा २०.८५ लाखांच्या गोवऱ्यांचा पुरवठा करण्यात आला. या खर्चाला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव ५ मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. समिती यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
आरोग्य विभागाचे प्रस्तावानुसार २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षासाठी दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्यांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला होता. हे कंत्राट २९ सप्टेंबर २०१६ ला संपुष्टात आले. त्यानंतरही गोवऱ्यांचा पुरवठा सुरू आहे.
आरोग्य विभागाने करारनाम्यातील अटी आणि नियम बदलण्याची सूचना केली आहे. तसेच नवीन निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दराने पुुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. महापालिकेतर्फे अंत्यसंस्कारासाठी प्रत्येकी १० किलो गोवऱ्यांचा मोफत पुरवठा केला जातो. तसेच दहन घाटावर कंत्राटदारानेच गोवºया वितरणासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावयाचे प्रस्तावित आहे. या घोळाला आरोग्य विभागातील कर्मचारी जबाबदार असल्याची माहिती आहे.