नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र व कार्यावर आधारित ही स्पर्धा होती. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. ही संपूर्ण स्पर्धा नि:शुल्क होती. जवळपास १११ शाळांमधील १४,८१५ विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच झाली होती. परंतु त्यापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी आले. जागेअभावी काही विद्यार्थ्यांना बाहेरच थांबावे लागले. १४ हजारावर विद्यार्थ्यांनी एकाचवेळी परीक्षा देऊन जुना विक्रम मोडला आणि नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली.आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. बानाईचे अध्यक्ष डॉ. सुनील तलवारे, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव डॉ. मनोज रामटेके, गोपाल वासनिक, प्रवीण जाधव, डॉ. विजय धाबर्डे, रवींद्र जनबंधू आदींसह बानाईची संपूर्ण टीम यावेळी कार्यरत होती. उर्वरित विद्यार्थ्यांनाही मिळाली संधीजागेअभावी आणि उशिरा आलेल्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही, त्यांनी परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आयोजकांपुढे मोठी पंचाईत उभी राहिली. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आयोजकांनी उर्वरित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा आकडा नोंदणीपेक्षा कितीतरी अधिक होता.प्रशस्तीपत्रांसह रोख पुरस्कारही मिळणारया स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याला ५० हजार रुपये रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. द्वितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यास ३० हजार व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास २० हजार रुपये रोखसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक शाळेतून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपये रोख दिले जाईल. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र दिले जाईल. दोन महिन्यानंतर भव्य समारंभात हे पुरस्कार दिले जातील. मध्य प्रदेशातील रेकॉर्ड तुटलायापूर्वी मध्य प्रदेशातील मेहर येथे प्रतिभा समाजसेवा कल्याण समितीच्यावतीने ‘राईट टू एज्युकेशन’ या विषयावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी एकाचवेळी ४९०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देऊन गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. बानाईने घेतलेल्या या परीक्षेत १४ हजारावर विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभागी हेऊन हा रेकॉर्ड तोडला. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसादबानाईचे अध्यक्ष सुनील तलवारे यांनी सांगितले की, आम्ही जी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. यासाठी सर्व शाळा, विद्यार्थ्यांसह नागपूरकरांचे आभार मानतो. जुना विक्रम तुटला आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडसाठी दोन पद्धती असतात एक त्यांची टीम स्वत: येऊन निरीक्षण करते. तर दुसरे त्यांना आवश्यक पुरावे सादर करावे लागतात. आम्ही दुसरी पद्धत अवलंबिली आहे.